दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । सासकल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचालित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिकन्यांनी कृषी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत दि. २३ नोव्हेंबर रोजी सासकल येथे ‘फळझाडांसाठी कलम करणे आणि डोळा बांधणी’, या विषयाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले.
यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे , प्रा.एन. ए. पंडित, प्रा.एस. वाय. लाळगे आणि विषय मार्गदर्शक- एस. एस. आडत यांचे कृषिकन्या वैभवी ढमे, शिल्पा भिसे, दिप्ती भोईटे, मैथिली पोरे, अस्मिता सावंत, गौरी रणदिवे, आर्या शिंदे यांना मोलाचे मागदर्शन लाभले.