
दैनिक स्थैर्य । 29 जुलै 2025 । फलटण । चौधरवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024-25 कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकरी व महिलांना दिले फळांचा गर बनविण्याचे प्रात्यक्षिक घेतले. फळांची उपलब्धता, फळांची प्रकिया, चवीसाठी, काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी तसेच दीर्घ काळासाठी साठवणूक करण्यासाठी गर बनविला जातो.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषीकन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत,कांबळे सानिका अमोल, काटकर स्नेहा संजयकुमार, कदम रोहिणी लक्ष्मण, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कांबळे प्रणोती सुनील, लडकत श्रेया संजय या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.