कंत्राटी महिला स्वच्छता कर्मचार्‍यांची सातारा पालिकेसमोर निदर्शने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 18 : सातारा नगरपरिषद अंतर्गत आरोग्य विभागात स्वच्छता कर्मचार्‍यांच्या सोबत ठेकेदारी पध्दतीने जवळपास 200 महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. सध्या जगामध्ये कोविड-19 या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशावेळी जीवाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी काम करत आहे. पालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचार्‍यांना सर्व सुविधा व वेळेवर पगार मिळतो. परंतु ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या महिला स्वच्छता कर्मचार्‍यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी आज रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेवून शिष्टमंडळाने त्यांच्यापुढे आपल्या अडीअडचणी मांडल्या.

ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या महिला स्वच्छता कर्मचार्‍यांचे गेली 3 महिने थकीत असलेले पगार त्वरित मिळावेत. स्वच्छता कर्मचार्‍यांचा पीएफ कपात करावा व त्याची पावती मिळावी. ठेका पध्दतीने काम करणार्‍या महिलांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करावेत अथवा चेकने पगार द्यावा. कायम कर्मचार्‍यांप्रमाणे साडी, बूट, रेनकोट मिळावेत. कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर 50 लाखांचा विमा उतरविण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी झालेल्या चर्चेवेळी माधवी कदम, राजू भोसले, लेखापाल हिंमत पाटील, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे  तसेच सुरेखा बडेकर, सावित्रीबाई वाघमारे, रेखा भोसले, सुगंधा गाडे, रत्ना सोनावले, हिराबाई पवार, अलका चव्हाण, सुमन गायकवाड, विद्या अडागळे, हिराबाई पवार, जयश्री दाबाडे, संगीता चव्हाण, जयश्री सावंत, पल्लवी राजेंद्र खरात, संगीता प्रकाश चव्हाण, लक्ष्मी सुरेश घाडगे, जयश्री गोविंद दाभाडे आदी स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!