दैनिक स्थैर्य | दि. २४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत मठाचीवाडी येथे स्वच्छ दूध उत्पादनाचे प्रात्यक्षिक दिले. गाईच्या कासेचे निर्जंतुकीकरण कसे करायचे तसेच स्वच्छ दूध कशाप्रकारे मिळवता येईल, याची माहिती दिली. हे प्रात्यक्षिक शेतकरी विकास जाधव यांच्या गोठ्यावर घेण्यात आले. यावेळी गावातील दूध उत्पादक तसेच शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा.स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, शिवांजली धुमाळ, पूजा मारवाडी, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, समृद्धी कुंजीर व समृद्धी उल्हारे यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीने स्वच्छ दूध उत्पादनाच्या प्रात्यक्षिकाविषयी माहिती दिली.