पिंपरद येथील शेतकर्‍यांना दिले अ‍ॅप्सचे ज्ञान आणि वापराचे प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटणच्या विद्यार्थिनींनी पिंपरद येथील शेतकर्‍यांना फलोत्पादन तंत्रज्ञान माहिती मिळवण्यासाठी अ‍ॅप्सचे ज्ञान आणि वापर यावर दिले प्रात्यक्षिक दिले.

फलटण एज्युकेशन संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी पिंपरद येथे फलोत्पादन संबंधी विविध अ‍ॅप्सचे ज्ञान आणि त्यांचा वापर याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी पिंपरद गावच्या सरपंच सौ. स्वाती भगत व गावातील शेतकर्‍यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली.

या कार्यक्रमासाठी २५ शेतकरी उपस्थित होते. त्यांना कृषीकन्यांनी विविध अ‍ॅप्सची माहिती चार्टद्वारे दिली. त्यामध्ये प्लांटा, मार्केट यार्ड, अ‍ॅग्रीओ, गार्डनाईज आणि होमगार्डन इत्यादी अ‍ॅप्सचा समावेश होता. तसेच कृषीकन्यांनी शेतकर्‍यांच्या मोबाईलमध्ये ‘अ‍ॅप्स डाऊनलोड’ कसे करावे व त्याचा वापर करून शेतीचा विकास जलदगतीने कसा करावा, हे सांगितले आणि या अ‍ॅप्सचे दैनंदिन शेतीच्या वापरासाठी महत्त्व शेतकर्‍यांना पटवून दिले.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, नितिशा पंडित मॅडम आणि प्रा. संजय अडत सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. प्रतीक्षा जगताप, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, निशिगंधा खुडे, आरती जाधव, समृद्धी जगताप, आर्या जाधव यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!