दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा येथे श्रावण कृष्ण ५, सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३ ते श्रावण कृष्ण १२, सोमवार, दि. ११ सप्टेंबर २०२३ अखेर आयोजित केला आहे.
या सप्ताहाची सुरूवात वीणा व ग्रंथपूजन ह. भ. प. पोपट महाराज भोसले यांच्या हस्ते होणार असून दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७.३० ते ११.३० ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी ४.३० ते ५.३० प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर, असे कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. संकेत महाराज यादव (मिरढे) यांचे कीर्तन, मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. पोपट महाराज भोसले (अनपटवाडी) यांचे कीर्तन होईल.
बुधवार, दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी ९ ते ११ ह. भ. प. अंकुश महाराज कदम (गोडसेवाडी) यांचे कीर्तन, गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह. भ. प. मीराताई महाराज दीक्षित (भुईंज) यांचे कीर्तन, शुक्रवार दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह. भ. प. संतोष महाराज ढाणे (निनाम पाडळी) यांचे कीर्तन, शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी ह. भ. प. अशोक महाराज पांचाळ (मृदंग महर्षी, आळंदी) यांचे कीर्तन होईल.
रविवार, दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ ते १२ ह. भ. प. गोविंद महाराज गोरे (आळंदी) यांचे कीर्तन, सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० वाजता भव्य दिंडी सोहळा व ‘श्रीं’ची नगरप्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर १०.३० ते १२ वाजेपर्यंत काल्याचे किर्तन ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (सोलापूर) यांचे होईल.
कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.