साखरवाडीतील बौध्द विहार मिळण्यासाठी आंदोलन करणार्‍या भीमसैनिकांना डेमोक्रेटिक पार्टीचा पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळावी, या मागणीसाठी सोमवारी शेकडो भीमसैनिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात सहभागी झालेल्या भीमसैनिकांनी जागा मिळण्याबाबत प्रशासनाने समाजाच्या मागणीचे निवेदन स्वीकारले असले तरी जागेबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे. फलटण तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाला डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया, सातारा जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. आंदोलनस्थळी जाऊन पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

आंदोलन करणार्‍या भीमसैनिकांचे काही बरेवाईट झाले तर डेमोक्रॅटिक पार्टी इंडिया स्वस्थ बसणार नाही व काही अनुसूचित प्रकार घडल्यास डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राजव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी पार्टीच्यावतीने दिला आहे.

हा पाठिंबा देतेवळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया प्रा. सुकुमार कांबळे (सर) संस्थापक अध्यक्ष, मंगेश प्र. आवळे, युथ अध्यक्ष, सातारा जिल्हा, अजिंक्य भैय्या चांदणे महा. प्रदेशाध्यक्ष, निलेश घोलप अध्यक्ष, फलटण तालुका अभिजीत ननावरे, सरचिटणीस सातारा जिल्हा, निलेश महादेव घोलप, अध्यक्ष फलटण तालुका हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!