दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । कुडाळ । जरंडेश्वर कारखान्याचा गळीप हंगाम सुरूच राहावा, अशी मागणी जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांसह जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या करण्यात आली आहे.
मागणीचे निवेदन जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे देण्यात आले आहे. जावली तालुक्याची अर्थवाहिनी व सहकाराचा केंद्र बिंदू असलेला प्रतापगड कारखाना सध्या बंद आहे. तसेच किसनवीर कारखानाही बंद असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांना आपला ऊस अन्य कारखान्यांना घालावा लागत आहे. चालू वर्षी तालुक्यातील बहुतांश ऊस जरंडेश्वर कारखान्याने उचलला आहे. दरम्यान जरंडेश्वरच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू असली तरी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवून ऊस उत्पादक शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, जावली तालुक्यात दिड लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन घेतले जात आहे. महु, हातगेघर धरणांचे पुर्णत्वाबरोबरच, बोंडारवाडी धरण झाल्यास ऊसाचे उत्पादन अधिक वाढू शकते. जरंडेश्वरचा गळीत हंगाम सुरू झालाच नाही तर जावली तालुक्यातील ऊस उत्यादक शेतकर्याबरोबरच जरंडेश्वरच्या ऊस उत्पादक, सभासदाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होवू शकते. कोरोना आजाराने अगोदरच सर्वसामान्य शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी शेतकर्यांच्या कष्टाचा व नुकसानीचा विचारविनीमय करून जरंडेश्वरचा गळीत हंगाम सुरू राहावा हीच विनंती शासनाकडे निवेदनाद्वारे करीत आहोत असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देताना जावली पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव पार्टे, सभापती मोहनराव शिंदे, मा. उपसभापती तानाजी शिर्के, बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे , जेष्ट नेते बबनदादा वारागडे, नारायण शिंगटे, वेण्णामाईचा अध्यक्ष सुरेश पार्टे , शिवाजीराव देशमुख , प्रकाश कदम , हेमंत शिंदे , सोमनाथ कदम , धनंजय पोरे, चंद्रकांत गवळी, दिलीप शिंदे, 3म्रान आतार , मोहन देशमुख, धनंजय पवार , रविंद देशमुख, प्रदिप देशमुख , सतिश देशमुख आदी मान्यवर उपस्थीत होते .