ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची अधिवेशनात मागणी करा; मराठा क्रांती मोर्चाची आमदार दीपक चव्हाणांकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२३ | फलटण | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे; यासाठी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आगामी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत; अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटण येथे करण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन आमदार दीपक चव्हाण यांना मराठा क्रांती मोर्चा, फलटणच्या वतीने देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे असणारे हक्काचे आरक्षण हे मराठा समाजाला 50% च्या आत म्हणजे ओबीसी मधुनच मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठा समाजाचे राज्य स्तरीय अधिवेशन कराड येथे भरविण्यात आले होते, या अधिवेशनामध्ये काही प्रमुख मागण्यांचे ठराव करण्यात आले, त्यातील एक प्रमुख मागणी अशी होती की येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपआपल्या स्थानिक आमदारांनी मराठा समाजाला 50% च्या आत मध्ये आरक्षण मिळावे ही मागणी मराठा समाजासाठी अधिवेशनामध्ये मांडावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा; यासाठी आज फलटण येथे मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षे मराठा समाज लढा देत आहे, त्यासाठी जगाला मार्गदर्शक ठरतील असे 58 मोठे मोर्चे शांततेत काढले,मात्र अजुनही आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला असून शिंदे फडणवीस सरकारने ताबडतोब मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

आमदार दीपक चव्हाण यांना निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक


Back to top button
Don`t copy text!