
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२३ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) गावच्या वनदेवशेरी येथील कु. ऋतुजा दादासो पिसाळ हिने आशिया कप हॉकीमध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारत देशाची तसेच कोळकी गावची मान उंचावली आहे. या विजयाबद्दल ऋतुजा हिचा कोळकी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम बुधवार, २८ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.
या सत्कार कार्यक्रमात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ हिचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संयोजक युवा मित्र तरुण मंडळ व ग्रामस्थ वनदेवशेरी (कोळकी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
