स्थैर्य, सातारा, दि. 30 : जगभरात कोरोना व्हायरस या महामारीने थैमान मांडले असून शासनाकडून जनहितार्थ लॉकडाउन करण्यात आले होते. परंतु या तीन महिन्यांत लॉकडाउन मुळे लोकांचे रोजगार, कामधंदा बंद असल्यामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच महावितरणाने वाढीव विजबिलांचा शॉकच सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. सर्व आर्थिक व्यवहार विस्कळीत झाल्याने, फायनान्स कंपन्या, बँकांचे हफ्ते, घरखर्च यामुळे गरीब जनतेचे हाल होत आहेत. काही नागरिकानी घरभाड्याने देऊन त्या भाडेकरू कडुन तीन महिन्याचे भाडे माफ केले आहे. त्या घरमालकांना भरमसाठ लाईटबिल आल्यामुळे ते सर्व नागरिक आर्थिक व मानसिक दृष्ट्या डळमळले आहेत. तरी शासनाने योग्य तो विचार करून तीन महिन्याचे वीजबिल माफ करून नागरिकांना दिलासा दयावा. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतिवीर सेनेकडून जिल्हाधिकारी सातारा आणि महावितरण अधीक्षक यांस देण्यात आले.
या वेळी छावा क्रांतीवीर सेना जिल्हाध्यक्ष रफीक शेख, असिफ नगारजी, उमेश वडणकर, जितू भांसे, अरीफ शेख, उमर शेख, जयवंत महाडिक, आनंद काळभोर, प्रकाश मोरे, तालुका अध्यक्ष मुबिन कुरेशी, आदी उपस्थित होते.