फलटण नगर परिषद मतदार याद्या सदोष दुरुस्त करुन फेर प्रसिद्धीची मागणी


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । फलटण । फलटण नगर परिषद आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ ते १३ च्या प्रभाग निहाय मतदार याद्या सदोष असून त्या रद्द करुन नवीन याद्या तयार कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांचेकडे, माजी नगर सेवक अशोकराव जाधव आणि भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केली असून सदर निवेदनासोबत मतदार याद्यामधील चुका दर्शविणारे काही कागद जोडले असल्याचे सांगण्यात आले आहे. नगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या सदर याद्या तपासता नकाशाप्रमाणे
चुकीच्या पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी हद्दीबाहेरील नावांचा समावेश असल्याचे नमूद करीत प्रत्येक प्रभागात २०० ते ३०० नावे प्रभाग निहाय व स्थळ दर्शविल्याप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील जाहीर केलेल्या नकाशानुसार सदर याद्या B. L. O. यांच्याशी विचार विनिमय न घेता मागील पद्धतीने केल्या असल्याने त्या याद्यांमध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत, तरी जाहीर झालेल्या प्रभाग नकाशा प्रमाणे ज्या त्या प्रभागातील नावे ज्या त्या प्रभागात समाविष्ट करुन नवीन योग्य मतदार याद्या तयार करुन फेर प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!