
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्यात कलाकार मानधन समिती स्थापन करून वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी दाखल परंतु प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करावी, अशी मागणी निरगुडी (ता. फलटण) येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी २०२२-२३ या सालामध्ये अनेक प्रस्ताव दाखल झाले आहेत; परंतु जिल्ह्यातील कलाकार मानधन समिती गेली अनेक महिन्यांपासून आजपर्यंत स्थापन न झाल्याने अनेक दाखल प्रस्ताव प्रलंबित आहेत. ही बाब वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी अन्यायकारक आहे. तसेच त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्यासारखे आहे.