भूखंड हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ९:  सातारा नगरपालिकेच्या मालकीची मालमत्ता व भूखंड हडप करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी शहर सुधार समितीचे सचिव अस्लम तडसरकर, कौन्सिल सदस्य विक्रांत पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेने घेतलेल्या अर्थसंकल्पीय सभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याचे निरीक्षण केल्यानंतर पालिकेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य, शासकीय मालमत्ता, न पा मालमत्ता यांचे विवरण कोठेही दिसत नाही. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, न.पाच्या मालमत्ता खुल्या जागा मालकिचे सेवा उद्योग क्षेत्र आकाशवाणी केंद्र, सातारा परिसर क्षेत्र, हुतात्मा स्मारक, आरटीओ परिसर तसेच मध्यवर्ती वस्तीत नगरपरिषद, शाळा क्र.11, 13 व 14 इमारतीसमोरील भारतरत्न मौलाना आझाद मैदान यावर टपरीकरण झाले आहे. याविषयी जागा संरक्षित करणे मौलाना आझाद मैदान विकसीत करणे या विषयीचे पत्र नगरपलिकेचे मुख्याधिकारी यांना दि.21 सप्टेंबर 2020 च्या पत्राने देवूनही यावर कोणतीही अद्याप कारवाई झाली नाही. ती कारवाई करावी, यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत, असे निवेदनात नमूद केले आहे.

Back to top button
Don`t copy text!