दोन रानगव्यांनंतर पुण्यातील रस्त्यांवर आढळला हरणांचा कळप, वनविभागाची शोध मोहिम सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि.३०: हरणांचा हा कळप पुण्यातील रहिवासी परिसरात फिरताना दिसला

पुण्यातील रहिवासी परिसरात जंगली जनावरे फिरण्याच्या घटना सुरुच आहेत. यापूर्वी पुण्यात दोन वेळेस रानगवा दिसला होता. यातील एका रानगव्याचा रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हरणांचा कळप शहरातील रहिवासी भागात फिरताना दिसला आहे.

पुण्यातील शिवने परिसरात मंगळवारी रस्त्यांवर काही हरिण फिरताना दिसले. यानंतर वन विभागाचे पथक या हरणांचा शोध घेत आहे. वन विभागाने या परिसरातील लोकांना आपल्या घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. हे पथक आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हरणांचा शोध घेत आहेत.

जंगलात परत गेल्याची शक्यता

अनेक तास वन विभागाने शोध घेऊनची या हरणांचा शोध लागला नाही. रात्री हा कळप परत जंगलात गेल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.


Back to top button
Don`t copy text!