दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२४ | फलटण | गत १५ वर्षांपासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रिय आमदार दिपकराव चव्हाण हे अतिशय सुसंस्कृत आमदार असून त्यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ध्यास घेतला असून फलटण कोरेगाव मतदार संघाचा विकास अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा निवडून देणे गरजेचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे “तुतारी वाजवणारा माणुस” हे चिन्ह लक्षात ठेवून मतदान करण्याचे आवाहन मत युवा नेते जयकुमार इंगळे यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना इंगळे म्हणाले की; सन 2009 साली दिपकराव चव्हाण हे श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर प्रथमता आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर ते आज अखेरपर्यंत त्यांच्या वागण्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. गावचा सरपंच झाला तरी त्याच्या डोक्यामध्ये सरपंचकीची हवा जाते. परंतु चव्हाण साहेब आमदार झाले तरीसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये कसलीही हवा गेली नाही. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिलेले आहेत.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांनी आमदार दिपक चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याचे अडीअडचण जाणून घेऊन ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी ते व्यक्तिशः प्रयत्नशील असतात. प्रश्न कोणताही असला तरी त्याबाबत ते कधीही दुजाभाव करत नाहीत. संबंधित नागरिकाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी दिपक चव्हाण स्वतः अगदी मंत्रालयापर्यंत सुद्धा पाठपुरावा करत असतात. या गोष्टीचा अनुभव घेतो पंधरा वर्षांमध्ये अनेक नागरिकांना आलेला आहे; असे मत सुद्धा यावेळी जयकुमार इंगळे यांनी स्पष्ट केले.