
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 07 नोव्हेंबर 2024 | फलटण | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचा व प्रचाराचा शुभारंभ आज दि. ०७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता श्रीराम मंदिर येथे आयोजित केलेला आहे.
यावेळी राजे गटाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गत तीन टर्म आमदार राहिलेले दीपक चव्हाण हे चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले असून त्यांच्या प्रचाराचा व प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फलटण येथील श्रीराम मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
