दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फरांदवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील मयुरेश्वर मंगल कार्यालयात लग्नाच्या वेळी वधू पक्षाच्या खोलीमधून १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३० वा. च्या सुमारास वधूच्या पाच तोळ्यांचे मणिमंगळसूत्र, इतर दागिने व रोख रक्कम असलेली पर्स (सुमारे २,५०,००० हजारांचे मुद्देमाल) चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात सौ. विमल संपत कर्णे (रा. आंदरुड ता.फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरीत १,५०,०००/- रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे चपट्या पट्टीतील काळे मनी असलेले सोन्याचे गंठण, ४५,०००/- रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे काळे मण्यांमध्ये ओवलेले सोन्याचा गंठण, त्यामध्ये २० सोन्याचे मणी व दोन वाट्या डोरली) असे असलेले, ५०,०००/- रुपये रोख रक्कम, ५,०००/-रु किमतीचा मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड व महाराष्ट्र बँकेचे पासबुक, अभुदय को-ऑपरेटीव्ह बँकेचे पासबुक अशी कागदपत्रे, असा एकूण सुमारे २,५०,००० मुद्देमाल लंपास केला आहे.
या चोरीचा अधिक तपास म.पो.हवा. आर. एस. फाळके करत आहेत.