
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
धुळदेव, ता. फलटण येथील धुळदेव वॉटर सप्लाय नावाचा डी.पी. चोरट्यांनी १६ नोव्हेंबरच्या रात्री फोडून त्यामधील २०० लिटर ऑईल नुकसान करत ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे १०० किलो वजनाची ५०,०००/-रुपये किंमतीची कॉपर वायर चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद निलेश कणसे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास म.पो.ना. हेमा पवार करीत आहेत.
