दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असताना प्रत्येक गावोगावी, वाड्यावस्त्यांवर सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत आहेत. सासकल (ता. फलटण) येथे राजे गट पुरस्कृत सत्तारूढ गट व विरोधी गट हे दोन्हीही गट राजे गटाचे असल्याने दोघांनी एकत्र येत दीपक चव्हाण यांना या निवडणुकीत भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. दोन्ही राजे गटांनी एकत्र येऊन आपापसातील मतभेद विसरून या निवडणुकीत कामाला सुरुवात केली आहे. संपूर्ण घर ते घर, वस्त्या ते वस्त्या प्रचार सुरू आहे. लोकांचा त्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे.
गावात सत्तारूढ गट व विरोधी गट हे दोन्ही गट राजे गटाचे असल्याने यावेळी सर्वांनी निश्चय केला असून या निवडणुकीत विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना मताधिक्य देणार आहोत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे झाली असून येणार्या काळातही गावच्या विधायक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने उरलेले ८०० मीटरचे डांबरीकरण करण्याचेही त्यांनी वचन दिले आहे. आतापर्यंत आमच्या गावाला सहा साकव पूल, सहा सभामंडप, फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणकडे जाणार्या रस्त्याचे दोनवेळा खडीकरण व मुरुमीकरण, ८०० मीटरचे तीनवेळा डांबरीकरण, सासकल ते बांधोळा रस्त्याचे डांबरीकरण, सासकल पाटी ते सासकल गावठाण रस्त्याचे डांबरीकरण, तीन मोठे बंधारे, जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रंथालय व दोन आरसीसीमधील खोल्या या कामांसह अजून अनेक कामे यापूर्वीच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी मार्गी लावले. येत्या काळात ही उर्वरित कामांना गती देऊन गावातील बेरोजगार युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याविषयी त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये संपूर्ण सासकल ग्रामस्थांच्या वतीने विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना मताधिक्य देऊ, असा विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील मूळचे राजे गटाचे चार दोन कार्यकर्ते हे त्यांच्या वैयक्तिक अडचणींपोटी विरोधी गटामध्ये गेल्या असून तेही पुन्हा स्वगृही परततील, असा आम्हाला विश्वास आहे. फक्त त्या चार-दोन कार्यकर्त्यांना एवढंच सांगणं आहे. गावातील तरुण पिढी ही व्यसनाधीन बनवू नका. त्यांना व्यसनाच्या आहारी लावू नका, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, ग्रामपंचायत सदस्य मोहनराव मुळीक, लता विकास मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, माजी सरपंच लक्ष्मण गणपत मुळीक, सोपान रामचंद्र मुळीक, सदानंद निळकंठ मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, मनोहर संभाजी मुळीक, निलेश मानसिंग मुळीक, दत्तात्रय दळवी, भैरवनाथ मुळीक, संजय निळकंठ मुळीक, वाल्मीक मदने, सर्जेराव शिंदे, भगवान हरिबा मुळीक, हनुमंत मुळीक, युवा नेतृत्व दिनेश दत्तात्रय मुळीक, सुधीर सोपान मुळीक, तुकाराम मुळीक, अंकुश तावरे, शंकर गोरे, मंगेश मुळीक(पाटील), राजेंद्र फुले, अनिल फत्तेसिंह मुळीक, जयसिंग गणपत खुडे, पोपट घोरपडे, भाऊसो फरांदे, ज्ञानदेव कुंभार, संतोष पोपट सुतार, मनोहर मुळीक(बंडा), उमाजी बाळू आडके, सूरज संपत मदने, वैभव धुमाळ, प्रतिक मुळीक व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.