वाई मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि. ०५: शेंदूरजणे वाई येथे आज मॅप्रो सेंटरवर आज कोविडं रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करण्यात आले रुग्णालयाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले उद्घाटन करण्यात आले.

मॅप्रो आय हॉस्पिटल शेंदूरजणे (ता वाई) येथील कोविडं रुग्णालयाचे उदघाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,आमदार मकरंद पाटील,नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे,उपनगराध्यक्ष अनिल सावंत,अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ सुभाष चव्हाण,प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर,पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर, आरोग्य अधिकारी डॉ संदीप चव्हाण, मुख्याधिकारी विद्या पोळ आदी उपस्थित होते.

वाई खंडाळा व महाबळेश्वर येथे मोठ्या संख्येने करोना रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी त्या त्या तालुक्यात आवश्यक त्या सेवा सुविधांचा वापर करून कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहेत असे सांगून मकरंद पाटील म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यात तापोळा, महाबळेश्वर ,डॉन ॲकॅडमी, बेल एअर रुग्णालय पाचगणी येथील वाई व कवठे ग्रामीण रुग्णालय किसन वीर महाविद्यालय येथील विळीगीकरण व उपचार कक्ष नंतर मॅप्रो सेंटरवर आज नव्याने साठ रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.मात्र सुरवातीला ३६रुग्णाची सोय येथे होणार आहे. नव्याने येथे आणखी २५ ऑक्सिजन खाटाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. खंडाळा तालुक्यातही जगताप हॉस्पिटल व खंडाळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत तीनही तालुक्यात मिळून ४०० ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या सोई रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत असल्याची माहिती यावेळी आमदार पाटील यांनी दिली. आजचे सेंटर साठी मॅप्रो ,गरवारे वॉल रोप्स, मांढरदेव देवस्थान, वाई मिशन हॉस्पिटल आदींनी मोठी मदत कार्य केल्यानेच हे सेंटर सर्वांसाठी उभारू शकलो असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मकरंद पाटील कौतुक केले तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मकरंद पाटील यांनी मतदार संघात अतिशय कौशल्यपूर्ण व अत्यन्त अभ्यासू पूर्ण पद्धतीने कोविड रुग्णालय उभारल्याचे सांगितले.प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!