दौलतनगर (मरळी) येथील ध्वजस्तंभ व ध्वजाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई याची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, डिके फ्लेग फौंडेशनचे डॉ. राकेश बक्षी, यशराज देसाई यांच्यासह  विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात हा पहिला शंभर फुटी ध्वज उभारण्यात आला आहे. ही अभिमानाची गोष्ट असून दौलतनगर येथे महारक्तदान शिबीराचे तसेच कोरोना योध्दांचा सत्कारही करण्यात आला. आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असून रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. या महारक्तदान शिबीरामध्ये 1 हजार 111 रक्तदान करणार आहेत. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी असेच लोकउपयोगी काम करुन एक आदर्श निर्माण करावा.

श्री. देसाई म्हणाले, शंभर फुटी ध्वजाचे लोकार्पण होत आहे. तसेच 1 हजार 111 नागरिक रक्तदान करणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी प्राथमिक स्वरुपात रक्तदान करणाऱ्या दात्यांचा तसेच कोरोना संसर्गाच्या काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सत्कार नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!