
स्थैर्य, फलटण, दि. ०१ : रुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन असते ज्यात रूग्णालयांसारख्या उपचाराच्या ठीकाणी रूग्णांची ने-आण करण्यासाठी वापरतात. काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते. आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. सामान्यत: त्या वाहनांना रुग्णवाहिका म्हणतात ज्या रुग्णांना ने-आण करू शकतात. सध्या फलटण शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत. फलटण शहरातील नागरिकांना रुग्णवाहिकेची गरज भासत होती. हीच गरज ओळखून फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे व युवा उद्योजक आशुतोष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश शैक्षणिक सामाजिक विकास संस्था व श्रीमंत मलठणचा राजा गणेशोत्सव मंडळ हे बाराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी ना नफा, ना तोटा या तत्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आलेले आहे.
फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांना जर रुग्णवाहिकेची गरज असेल दिवसभरातील चोवीस तासामध्ये तर त्यांनी युवा उद्योजक आशुतोष थोरात 8600442000 यांच्यासह पुढील नंबरवर 7517240231, 9623297007 संपर्क साधावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी केलेले आहे.