फलटण विमानतळा लगत उभारलेल्या बागेचे आज लोकार्पण


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । फलटण ।  फलटण विमान तळालगत वन विभागाने सुमारे १० एकर क्षेत्रावर उभारलेल्या आणि कमिन्स (इं) फौडेशन व अरोहनम यांच्या माध्यमातून विकसीत केलेल्या बागेचा लोकार्पण सोहोळा उद्या सोमवार दि. ४ जुलै रोजी समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

सोमवार दि. ४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर सदर वन उद्यान शहर वासीयांसाठी खुले करण्यात येणार आहे. या वन उद्यानात नक्षत्र गार्डन, लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक, उत्तम बैठक व्यवस्था, सुंदर, मनोहारी कारंजे, विविध फुलझाडे आणि एकूणच अत्यंत उत्कृष्ट बाग फलटण कराना उपलब्ध होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!