स्थैर्य, फलटण, दि. 12 : येथील प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांचे वडील चिंतामणी सिद्धाप्पा पाटील यांचे वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कामेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी लॉक डाऊन मुळे मर्यादित लोक उपस्थित होते, मात्र त्यानंतर अनेकांनी घरी जाऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.