चोराडे येथे झालेल्या अपघातात शंकर महादेव पवार यांचा मूत्यू


स्थैर्य, औंध, दि.१५: चोराडे ता.खटाव येथे  टाका नावाच्या शिवाराजवळ  शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीवरील शंकर महादेव पवार वय 55यांचा  इनोव्हा गाडीने दिलेल्या धडकेत मूत्यू झाला.
शंकर पवार हे चोराडे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन होते. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान करून ते  परत चोराडे गावाकडे निघाले असताना इनोव्हा गाडीने धडक दिल्याने त्यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मूत्यू झाला.
इनोव्हा चालक विपुल संदेश सावंत रा.रेणावी ता.खानापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

Back to top button
Don`t copy text!