ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची हानी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई


दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । मुंबई । लोकमत समूहाचे माजी समूह संपादक व समन्वयक संपादक दिनकर रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

श्री.देसाई आपल्या शोक संदेशात म्हणतात, दिनकर रायकर यांनी इंडियन एक्सप्रेस समूहात दीर्घकाळ पत्रकारिता केली. तसेच लोकसत्ता दैनिकातही त्यांनी काम केले. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील अनेक घडामोडींचा त्यांचा सखोल अभ्यास होता. अनेक राजकीय घटनांचे ते साक्षीदार होते. मराठी पत्रकारितेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. रायकर यांच्याशी आपले अनेक वर्षांपासून व्यक्तीगत तसेच जिव्हाळ्याचे संबंध होते, अशा शब्दांत मंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!