दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । कोळकी । मुधोजी हायस्कूल, फलटण’चे उपशिक्षक अमोल सपाटे यांचे वडील व कोळकी ता. फलटण गावचे जेष्ठ नागरिक तथा जिल्हा परिषद शाळेतील माजी मुख्याध्यापक पोपटराव शंकरराव सपाटे (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कोळकीच्या मालोजीनगर येथे असणाऱ्या श्री हनुमान मंदिराच्या स्थापनेपासून त्यांनी श्री हनुमानची मनोभावे दैनंदिन पूजा व अर्चा ते करत असत.