
स्थैर्य, फलटण दि. २४ : न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी येथील निवृत्त कार्यालय अधिक्षक सुधीर सहस्त्रबुद्धे यांच्या मातोश्री श्रीमती विजयाबाई रामचंद्र सहस्त्रबुद्धे (माई) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
जुन्या काळातील एक कर्तव्य कठोर आणि कुटुंब वत्सल स्त्री म्हणून फलटणकर त्यांना ओळखत होते. त्यांच्या जाण्याने सहस्त्रबुद्धे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी फलटणकर नागरिक व आप्तेष्ट यांनी अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
येथील आर्टिस्ट जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या त्या मातोश्री होत.