दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । सातारा । शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा, फी या योजनेचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सन 2020-21 Re Apply व 2021-22 साठी नुतनीकरण (Renewal) करण्याची मुदत दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 पासून महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्ती शिक्षण फी परिक्षा फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी या योजनेचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीसाठी दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या बाबत जिल्ह्यातील महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की, अनुसूचित जती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावेत. पात्र विद्यार्थ्यांना या बाबत सूचना देण्यात याव्यात. सदर सूचना महाविद्यालयाच्या सुचना फलक दर्शनी भागात लावाव्यात अर्ज भरण्याच्या सुचना प्रत्येक वर्गात दररोज फिरविण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या व्हॉटसअप ग्रुप तयार करुन त्यावर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना व शिक्षण फी व परिक्षा फी योजनेचे स्वरुप, मिळणारे लाभ, पात्रता इ. बाबत विस्तृतपणे महाविद्यालयात प्रसिध्दी देण्यात यावी.
महाविद्यालयामध्ये अर्ज भरण्याचे सेंटर तयार करावे तसेच अर्ज करण्याकरिता महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संगणक व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत जेणे करुन विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
सन 2020-21 Re Appy व 2021-22 साठी नवीन अर्ज व Renewal करण्याची मुदत दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कॉलेज अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ भरुन घेण्यात यावेत. तसेच सदर अर्जाची काटेकोर तपासणी करुन पात्र अर्ज तात्काळ सहायक आयुक्त समाज कल्याण यांचे कार्यालय लॉगीनमध्ये पाठविणेत यावेत. पात्र विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात शिष्यवृत्ती शिक्षण फी / परिक्षा फी व इतर योजनेच्या लाभाकरिता अर्जाची नोंदणी करुन घेण्यात यावी.