दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण |
वर्षभरापासून पिंपरी चिंचवड क्राईम बॅचच्या प्रमुख असणार्या डीसीपी स्वप्ना गोरे कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आत्तापर्यंत ३५० गुन्हेगारांना ‘मोक्का’ कायद्यांतर्गत गजाआड केले आहे. डीसीपी स्वप्ना गोरे यांना फलटणचे चंद्रकांत खामकर यांच्या कन्या आहेत.
डीसीपी स्वप्ना गोरे यांचा क्राईम बॅचच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला प्रमुख म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आत्तापर्यंत त्यांनी गंभीर गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना गजाआड केले आहे. उकल न होणार्या खून, दरोडे, लुटमार अशा गंभीर अशा गुन्ह्यांचा तपास डीसीपी स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होतो.
‘डीवायएसपी’ पदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कामास सुरूवात केली होती. पुण्यात एसीपी, कणकवलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, अॅडिशनल ‘एसपी’ वाशी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
संघटीत गुन्हेगारीत सामील असणार्या ३०० हून अधिक गुन्हेगारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव डीसीपी गोरे यांनीच मांडला होता.
डीसीपी स्वप्ना गोरे या ‘एमपीएससी’तून ‘डीवायएसपी’पदी पोलीस सेवेत दाखल झाल्या आहेत. डीसीपी गोरे यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाबरोबरच फलटणचेही नाव पोलीस प्रशासनात उंचावत आहे.