सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.०५ : मुलीचा नवरा, सासू व जाऊ यांच्या जाचहाटाला कंटाळून मुलीनी आत्महत्या केली असल्याची फिर्याद श्रीमती वंदना संजय बोंद्रे (रा.लक्ष्मीनगर, फलटण) यांनी बारामती पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत बारामती पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती वंदना संजय बोंद्रे यांची कन्या सृष्टी संजय बोंद्र हिचा विवाह सन 2014 साली उन्मेघ किशोर गायकवाड (रा.बारामती, जि.पुणे) याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरकडच्यांनी मुलीचे नाव सई ठेवले होते. सासरी नांदत असताना सौ.सई यांना लग्नानंतर चार – पाच महिन्यांनी सासू शोभा किशोर गायकवाड, जाऊ तनुजा तृणाल गायकवाड व नवरा उन्मेघ किशोर गायकवाड हे किरकोळ कारणावरुन सतत बोलून मानसिक त्रास देत होते. नवरा उन्मेघ हा दारु पिऊन सौ.सई यांना मारहाण करीत होता. तसेच त्यांना अश्‍लिल व्हिडीओ दाखवून तू माझेशी तसे शारीरीक संबंध कर, असा शारीरिक त्रास ही देत होता. दि.24/2/2021 रोजी सौ.सई यांनी त्यांच्या आई श्रीमती वंदना बोंद्रे यांना फोन करुन नवरा मारहाण करुन मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याचे सांगून गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सदर प्रकरणी, दि.8/6/2014 ते दि.24/2/2021 या कालावधीत सई उन्मेघ गायकवाड हिस नवरा उन्मेघ याने दमदाटी, मारहाण, चारित्र्यावर संशय घेणे, शारिरीक व मानसिक त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्याच्या आरोपाखाली उन्मेघ किशोर गायकवाड, सासू शोभा किशोर गायकवाड, जाऊ तजुना तृणाल गायकवाड यांच्याविरोधात मयत सई गायकवाड यांच्या आई श्रीमतो वंदना बोंद्रे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक योगेश इंगळे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!