दत्तात्रेय कोकरे यांची सातारच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी पदोन्नती


दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । मुंबई । कोंकण विभागीय माहिती कार्यालयातील सहाय्यक संचालक दत्तात्रेय कोकरे यांना जिल्हा माहिती अधिकारी म्हणून येथे पदोन्नती मिळालेली आहे. त्यांची सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज कोंकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोकरे यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी यावेळी शुभेच्छा दिल्या.

दत्तात्रेय कोकरे हे गेली तीन वर्षे विभागीय माहिती कार्यालय, कोंकण भवन येथे सहायक संचालक या पदावर होते. या काळात त्यांनी मंत्रालय, पालघर, डहाणू, पुणे येथे कामकाज पाहिले. कोकरे यांच्या पदोन्नतीमुळे विभागीय माहिती कार्यालयातील सहाय्यक संचालक या रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!