मोर्वे येथे दत्त जंयती उत्साहात साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषात आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून खंडाळा तालुक्यातील श्री क्षेत्र मोर्वे येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दत्त जयंती साध्या पध्दतीने साजरी केली जात होती. मात्र, यावेळी कोरोनाचे नियम पाळून दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खंङाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र मोर्वे येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी केली जात नव्हती. पण यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून दत्त जयंती उत्सवाला सुरू झाली.

सकाळपासून काकड आरती भजन कीर्तन सुरू तसेच दत्त मंदिर आकर्षक फुलांनी आणि सजविण्यात आले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सातारा, पुणे, आदी जिल्ह्यातील भाविकांनी दत्त दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती पोलीस प्रशासनाकडून व दत्त देवस्थान समितीकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्रीदत्त प्रभू यांची आकर्षक फुलांनी सजावट केलेल्या रथाची गावातून प्रदाक्षिणा कोरोनाचे नियम पाळून काढण्यात आली. त्यानंतर दतजन्म सोहळा पाळणा नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!