
दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । फलटण । श्रावण मासामध्ये भाविकांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात, यासाठी फलटण एसटी आगारामार्फत दर्शन यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
अकलकोट, तुळजापूर, पंढरपूर दर्शन, अष्टविनायक दर्शन, कोल्हापूर, आदमापूर, जोतिबा दर्शन, शनिशिंगणापूर, शिर्डी दर्शन, बेकर, भीमाशंकर दर्शन, साडेतीन शक्तिपीठ दर्शन, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, शेगाव दर्शन याप्रमाणे फेर्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे यांनी केले आहे. तिकीट आरक्षणासाठी राहुल वाघमोडे, शुभम रणवरे (सहाय्यक कार्यशाळा अपीक्षक), सुहास कोरडे (प्रभारी स्थानकप्रमुख), रवींद्र सूर्यवंशी (वाहतूक निरीक्षक), सुखदेव अहिवळे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक), धीरज अहिषळे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक), प्रमोद साळुंखे (वाहतूक नियंत्रक) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.