दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२४ | फलटण |
सोनगाव (ता. फलटण) गावचा सुपुत्र दर्शन कांबळे याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.
जिद्द, चिकाटी, नम्रता, व कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोनगावच्या या सुपुत्राची सैन्यदलात निवड झाली आहे.
दर्शनच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. तसेच गावातून सैन्यदलाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी प्रतिनीधीत्व मिळाल्याने सर्वांनाच त्याचा अभिमान आहे.
दर्शनचा सर्व तरुण मंडळ सोनगाव, फौजी पोलीस मित्र संघटना, ग्रामपंचायत सोनगाव, श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ सोनगाव, सोनगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती, सोनगाव बंगला यांच्यावतीने सत्कार समारंभ उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमप्रसंगी सोनगावचे सरपंच व सोनगाव वि.का.स. सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री. पोपटराव बुरूंगले, विद्यमान सरपंच प्रतिनिधी श्री. रमेश जगताप, श्री. हनुमंत थोरात, प्रा. राजेश निकाळजे, श्री. संदीप शेंडे यांनी आपल्या मनोगतातून त्याचे कौतुक व अभिनंदन केले.
याप्रसंगी दर्शन याच्याबरोबर त्याच्या आई-वडिलांचाही हार, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या गरजू व होतकरू तरुणांना सर्व मंडळ व फौजी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचा निश्चय करण्यात आला.
यावेळी श्री. रामहरी पिंगळे (मा. फौजी), दत्तात्रय ननावरे, राजेंद्र आडके, बाबासो टेंबरे, बाबासो लवटे, संदीप पिंगळे, संतोष गोरवे, शशिकांत मोरे, रमेश मदने, राहुल गायकवाड, लखन पिंगळे, अमोल मोरे, दिलीप भंडारे, सुरेश पवार, धर्मराज लांडगे, स्वप्नील वाघ (फौजी), शिवाजी ढवळे, सुनील यादव, सुरज गोरवे, गणेश यादव, गणेश कांबळे, गणेश नामदास, संकेत बुरुंगले, सचिन शेंडे, रोहन शेंडे, सचिन नाळे, हनुमंत टेंबरे, अमर टेंबरे, अनिकेत भोसले, चैतन्य पिंगळे, शशिकांत नामदास, अनिल रिटे, सुनिल रिटे, अतुल लोंढे, दादासो बंडगर, बबन सूळ, हरिश्चंद्र लोंढे, डॉ. बिरोबा पिंगळे, श्रीकांत यादव, आदित्य ओव्हाळ, आदित्य गेजगे, मारूती जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.