दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहरामधील महात्मा फुले चौकाजवळील पाण्याची टाकी हि धोकादायक झालेली होती. सदरील पाण्याची टाकी हि नगरपरिषदेने जमीनदोस्त केली असून त्याच ठिकाणी सुमारे दहा हजार लक्ष लिटरची पाण्याची टाकी नव्याने बांधण्यात येणार आहे. सदरील नूतन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या नूतन पाण्याच्या टाकीमधून फलटण शहरातील विद्यानगर, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, स्वामी विवेकानंद नगर, बुधवार पेठ, मारवाड पेठ, हडको वसाहत, लक्ष्मीनगर, महाराजा मंगल कार्यालय परिसर व शिवाजी नगर या भागामध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.