दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण | पोंभुर्ले, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे दैनिक “स्थैर्य”च्या २०२५ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते संपन्न झाले. ही कार्यक्रम संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, शामराव अहिवळे, सुभाष भांबुरे, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादीक डोंगरकर, अॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर यांची उपस्थिती होती.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
सातारा येथे जिल्हा माहिती कार्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालयानाच्या पुणे विभागीय प्रभारी उपसंचालक तथा सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न झाले.
दैनिक “स्थैर्य”च्या २०२५ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होता ज्यामध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी भाग घेतला. या दिनदर्शिकेमुळे वर्षभराच्या महत्त्वाच्या तारखा आणि घटनांची माहिती सोप्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाने स्थानिक स्तरावर पत्रकारितेच्या क्षेत्रातील एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत केली.