दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दहिवडीच्या वनपालास अटक; बंधार्‍याच्या कामाच्या बिलापोटी पोटठेकेदाराकडून स्वीकारली रक्कम


स्थैर्य, माण, दि.०४: शिंदी खुर्द, ता. माण येथील माती बंधार्‍याच्या कामाच्या बिलाचा चेक काढण्यासाठी पोट ठेकेदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दहिवडी वन परिक्षेत्राचा वनपाल वर्ग -3 यास अँटीकरप्शनने सापळाच रचून अटक केली. सुर्यकांत यादवराव पोळ, वय- 57, रा. सरकारी दवाखान्यामागे, गायत्री निवास दहीवडी असे त्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, तक्रारदार पोट-ठेकेदाराचे शिंदी खुर्द येथे माती बंधारा काम करत आहे. या कामापोटी बिलाचा चेक देण्यासाठी सूर्यकांत पोळने संबंधित पोटठेकेदाराला दहजारांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार संबंधित पोटठेकेदाराने अँटिकरप्शनकडे केली. त्यानंतर अँटिकरप्शनने दि. 2 रोजी याची पडताळणी करून सापळा लावला. आरोपी सूर्यकांत पोळने तडजाडी अंती ठरलेली दहा हजारांची लाच स्वीकारली व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने लाच रक्कम अज्ञातस्थळी फेकून दिली. त्यानंतर त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर लोकसेवककडे व परिसरात लाच रकमेचा शोध घेतला असता लाच रक्कम मिळून आली नाही.

ही कारवाई पोलीस अधीक्षक (लाप्रवि पुणे)चे राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (लाप्रवि सातारा) अशोक शिर्के, संजय साळूंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी कली.


Back to top button
Don`t copy text!