प्रभाग क्र. 8 व 11 मधून दादासाहेब चोरमले यांची राजे गटाकडे उमेदवारीची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. 7 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राजे गटाकडून प्रभाग क्रमांक 8 आणि 11 मधून (ओबीसी सर्वसाधारण) सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.

दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रभागातून उमेदवारी मिळाल्यास आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू, असा विश्वास दादासाहेब चोरमले यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या 30 वर्षांपासून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे.

या विकास पर्वात गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कुटुंबालाही छोटासा वाटा उचलण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!