सातारा जिल्हा ऍम्युचर खोखो असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी दादासाहेब चोरमले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । सतारा । सातारा जिल्हा ऍम्युचर खोखो असोसिएशनची सन २०२२ ते २०२७ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यासोबतच खो – खोचे राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

फलटण येथील मुधोजी हायस्कूल येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदरील निवडी या बिनविरोध करण्यात आल्या.

सन 1992 साली बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेमध्ये दादासाहेब चोरमले यांना सुवर्णपदक प्राप्त आहे. यासोबतच सातारा जिल्ह्यामधील पुरुष खो – खो खेळाडूंमध्ये सीनियर राष्ट्रीय खेळाडू म्हणून दादासाहेब चोरमले यांच्याकडे पाहिले जाते. दादासाहेब चोरमले यांच्या निवडीमुळे खो – खो असोसिएशनला नक्कीच फायदा होईल, असे ही मत खो – खोचे खेळाडू व्यक्त करीत आहेत.

सदरील झालेल्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शैक्षणिक सामाजिक व सर्वच क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

दादासाहेब चोरमले हे फलटण येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच दादासाहेब चोरमले हे सामाजिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामधून त्यांच्यावर विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.


Back to top button
Don`t copy text!