
दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । फलटण । भारत सरकार नोंदणीकृत महा डिजिटल मिडिया असोसिएशन अर्थात एमडीएमए या स्वंनियामक संस्थेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण यांनी सदर निवडीची घोषणा केली आहे.
महा डिजिटल मिडिया असोसिएशन ही भारत सरकार नोंदणीकृत स्वयं-नियामक संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताराव व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनायकराव शिंदे यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन होत असते. डिजिटल मिडियामध्ये काम करणारे संपादक, प्रकाशक प्रतिनिधी, पत्रकार यांच्या न्यायहक्कासाठी महा डिजिटल मिडिया असोसिएशनच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केला जातो. तसेच वेगवेगळे कोर्सेसच्या माध्यमातून पत्रकारांना प्रशिक्षित केले जाते.
या निवडीबद्दल कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, संस्थेच्यावतीने चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी आशिष रईच, कोल्हापुर जिल्हा अध्यक्षपदी सुशांत पवार, खान्देश जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सूक्ष्मलोक न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक विठ्ठल कौतिक पाटील, पुणे ग्रामिण जिल्हाध्यक्षपदी अमित बगाडे, सोलापुर शहर अध्यक्षपदी डॉ.रविंद्र सोरते या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.