दिखाऊ पेक्षा टिकाऊ वृत्ती जोपासा : उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । बारामती । देश सेवा व पोलीस सेवा बजावताना जिद्द, आत्मविश्वास कामी येतो. त्यामुळे आदर्श घेणाऱ्यांनी दिखाऊ पेक्षा टिकाऊ वृत्ती जोपासा असा सल्ला बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी उपस्तितांना दिला आहे.

सतरा वर्ष देशसेवा बजावून आर्मी मधून सेवा निवृत्त झालेले अनिल कायगुडे व पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळालेले संजय चौधर यांचा व माजी सैनिक व पोलीस यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, बारामती तालुका जय जवान सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, राष्ट्रवादी युवक नगर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाडोळे व वंजारवाडी ग्रामपंचायत, विविध मंडळे, प्रतिष्ठान चे पदाधिकारी व ग्रामस्थ होते.

विद्यार्थी व युवकांनी झटपट च्या पाठीशी न लागता यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, हे विसरू नये. देश सेवा ही महत्वपुर्ण सेवा आहे. तर कायदा सुव्यवस्था ठेवत पोलीस क्षेत्रात काम करणे ही आव्हानात्मक बाब असल्याने वंजारवाडीमधील आजी माजी सैनिक, पोलीस आणि त्यांचे कुटूंबीय खरे हिरो आहेत, असेही गणेश इंगळे यांनी सांगितले.

देश सेवा केल्यानंतर गावाने केलेला सत्कार कायम स्वरूपी लक्षात राहील असे निवृत्त सैनिक अनिल कायगुडे यांनी संगीतले. तर पदोन्नती मिळवून अधिकारी झाल्यावर झालेला सत्कार म्हणजे जवाबदारी वाढल्याची जाणीव करून दिली आहे, असे पोलीस निरीक्षक संजय चौधर यांनी सांगितले.

या प्रसंगी आजी माजी सैनिक, पोलीस यांच्या आई वडिलांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

विविध मान्यवरांनी मनोगत केले
समस्त वंजारवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने सदर कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळे – पाटील यांनी केले.

या प्रसंगी निवृत्त सैनिक अनिल कायगुडे व पोलीस निरीक्षक संजय चौधर यांची घोड्यावर बसून वंजारवाडी मधून भव्य मिरवणूक ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!