कच्च्या तेलाचे दर ७५. २ डॉलर प्रति पिंपावर पोहोचले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२ जुलै २०२१ । मुंबई । सकारात्मक अंदाजामुळे तेलाच्या दरांना आधार मिळाला. त्यामुळे ओपेक तेलाचे उत्पादन वाढवण्याच्या विचारात आहे. गुरुवारी कच्च्या तेलाचे दर २.४ टक्क्यांनी वाढले आणि ७५.२ डॉलर प्रति पिंपावर स्थिरावले. अमेरिकी क्रूडसाठ्यात घट, मागणीत वाढण्याची शक्यता आणि येत्या काही महिन्यांत ओपेक+ उत्पादक देश उत्पादन वाढवण्याची शक्यता असल्याने तेलाच्या दरांना आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज (ओपेक) आणि सदस्यांनी ठरवले की, ऑगस्ट २०२१ आणि डिसेंबर २०२१ दरम्यान दर दिवशी बाजारात २ दशलक्ष पिंप एवढा पुरवठा जास्त करायचा. वर्षाच्या दुसऱ्या भागात इंधनाच्या मागणीत वाढ होण्याच्या अंदाजानंतर हा निर्णय घेण्यात आला. तसेच कोव्हिड-१९ विरोधातील लसीकरणाचा वेग आणि निर्बंधात घट होण्याचाही हा परिणाम आहे.

तथापि वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमित झालेल्यांची आकडेवारी, प्रमुख तेल उपभोक्ता देशांमध्ये वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. परिणामी बाजारही याबाबत सावध आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, मागील आठवड्यात अमेरिकी क्रूडच्या साठ्यात ६.७ दशलक्ष पिंपाने घट झाली. बाजाराने ४.२ दशलक्ष पिंप घसरणीचा अंदाज वर्तवला होता. तोही आकडा पार झाला. त्यामुळे तेलाच्या दरात सलग सहाव्या आठवड्यात घसरण दिसून आली.


Back to top button
Don`t copy text!