खेळाडूंसाठी केंद्र सरकारची मोठी संधी; ५२१ पदांवर होणार थेट भरती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

केंद्रीय राखीव पोलीस दलाने क्रीडा कोट्यातून हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२१ जागांसाठी भरती प्रक्रियेची घोषणा केली असून, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

स्थैर्य,सातारा, दि. ०६ ऑक्टोबर : केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) गुणवंत खेळाडूंसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सीआरपीएफने क्रीडा कोट्यांतर्गत हेड कॉन्स्टेबल (General Duty) आणि कॉन्स्टेबल (General Duty) या पदांच्या एकूण ५२१ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या तरुण-तरुणींना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांना १२ ऑक्टोबरपासून अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

पात्रता आणि वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेत हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, तर कॉन्स्टेबल पदासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धेतील पदक किंवा सहभागाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे वय १ ऑगस्ट रोजी १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे असून, आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

वेतन श्रेणी आणि अर्ज प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय आकर्षक वेतन श्रेणी मिळणार आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी २५,५०० ते ८१,१०० रुपये (पे लेव्हल-४) आणि कॉन्स्टेबल पदासाठी २१,७०० ते ६९,१०-० रुपये (पे लेव्हल-३) वेतनश्रेणी लागू असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांना rect.crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!