कोरोनाला न जुमानता दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी


 

स्थैर्य, मुंबई, दि.९: दिवाळीच्या खरेदीसाठी
कोरोनाची भीती न बाळगता मुंबईकर विविध वस्तू, कपडे खरेदी करण्यासाठी
बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. यामुळे अनेक ठिकणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या
नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत असून वाहतूककोंडीतही भर पडल्याचे
जाणवते.

दिवाळी अवघ्या ६-७ दिवसांवर अली आहे.
कोरोना संसर्गामुळे गेले काही महिने बंदिस्त जीवन जगणा-या मुंबईकरांनी
पुनश्च हरिओमनंतर तसेच दिवाळीच्या पाशर्वभूमीवर उत्साहात उत्सवी खरेदी
करण्याला प्राधान्य देत आहेत. कपडे ,दागिने, सजावटीसाठी वस्तू खरेदीसाठी
अनेकजण दादर परिसरात येत आहेत. मास्क लावणारे मुंबईकर सुरक्षित अंतर मात्र
पाळत नसल्याचे चित्र आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!