लोणंद येथे कंटेंटमेंट झोनमध्ये दुकाने चालू ठेवणारांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, लोणंद, दि. 19 (सुरेश भोईटे) : लोणंद नगरपंचायतीच्या हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोनमधे देखील दुकाने सुरु ठेवणारांवर नगरपंचायतीच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे.

आज दिनांक 18 रोजी नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचा आदेश असूनही सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या  रोहीत दोशी यांचे स्वराज ट्रेडर्स, संजय जनार्धन पाटणकर, यांचे कापड दुकान. रामचंद्र शंकर पवार यांचे हारे, पाट्या केरसुणीचे दुकान, मारूती तुकाराण पवार यांचे हारे, पाट्या केरसुणीचे दुकान, विपीन गुलाबचंद रावल यांचे कापड दुकान, महंमद अलीमहंमद कच्छी यांचे लाकुड वखार, नंदकुमार रामचंद्र गुंडगे यांचे कापड दुकान, दिगंबर मलगुंडे यांचे कापड दुकान यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात असलेली आपली दुकाने उघडुन आपल्या कृत्यामुळे कोरोना साथीचा जाचक रोग पसरु शकतो हे माहित असताना सुद्धा अनावश्यकपणे मानवी जिवीत व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केले. तसेच जिल्हाधिकारी सातारा यांचे सीआरपीसी 144 प्रमाणे पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. या कारवाईत लोणंद नगरपंचायतीचे सीईओ हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट क्षीरसागर, रोहित निंबाळकर, गोरख माने, रामदास तुपे, पापा पानसरे श्रद्धा गर्जे ,हणमंत माने, विजय माने या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!