
दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । सातारा । विवाहाचे आमिष तसेच जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देत जिल्ह्यातील विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार करुन तिला त्रास दिला. सततचा हा त्रास सहन न झाल्याने एका तरुणीने विषारी औषध घेतले. याप्रकरणी ऋत्विक शांताराम दौडमणी रा. सदरबझार, सातारा याच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
शाहूपुरी पोलिस स्टेशनमधून देण्यात आलेली माहिती अशी, विवाहाचे आमिष दाखवून आणि जीवाचे बरे वाईट करुन घेईन, अशी धमकी देत संशयिताने तरुणीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याचार केला. तसेच अशा घटनांमुळे तरुणी लग्न कर अशी म्हटल्यावर संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळल्याने तरुणीने विषारी औषध घेतले. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पतंगे हे करीत आहेत.