अपघातप्रकरणी जीप चालकावर गुन्हा


स्थैर्य, सातार, दि. 2 : सातार पंचायत समितीसमोर प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपमधून पडून युवती जखमी झाली. याप्रकरणी जीपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, जीप चालक शिवाजी हिंदूराव कदम हा प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपवर चालक आहे. दि. 1-3-2020 रोजी काळी-पिवळी जीप घेवून बाँबे रेस्टॉरंटपासून पंचायत समितीकडे येत होता. यावेळी जीपचा दरवाजा व्यवस्थित लावले नव्हते. तो दरवाजा अचानक उघडला गेल्याने जीपमधील वैष्णवी अरविंद सणस वय 20 रा. शिवाजीनगर, ता. वाई ही युवती गाडीमधून पडून जखमी झाली. याप्रकरणी जीपचालक शिवाजी कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!