स्थैर्य, सातारा, दि. 10 : येथील आकाशवाणी झोपडपट्टी येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल शिवाजी पाटोळे रा. राधिकारोड, सातारा असे संशयीताचे नाव आहे. संशयीताने आकाशवाणी येथून दि. 5 रोजी तिच्या फिर्यादीच्या संमतीशिवाय फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी तिच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.